Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रह्या नवरात्रीची सुरुवात करा सत्यम ज्वेलर्स मधून सोने खरेदीने… ग्राहकांसाठी सत्यम ज्वेलर्सची...

ह्या नवरात्रीची सुरुवात करा सत्यम ज्वेलर्स मधून सोने खरेदीने… ग्राहकांसाठी सत्यम ज्वेलर्सची खास दसरा – दिवाळी ऑफर

ऑक्टोबर महिना हा विविध सणांनी भरलेला आहे. नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच तुम्हालाही घरची साफसफाई, विविध वस्तूंची खरेदी, सुट्ट्यांचं प्लॅनिंग आणि विविध सणांची तयारी अशा बऱ्याच गोष्टी करायच्या असतील.

घराला सुख-समृद्धी आणि भरभराट देणारा – नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला.

दुसरी आख्यायिका अशी आहे की, माता सीतेचे रावणाने हरण केले तेव्हा तिला परत आणण्यासाठी श्रीरामाला रावणाशी युद्ध करावे लागले. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामेश्वरममध्ये देवी दुर्गा शक्तीच्या रूपात नऊ दिवस पूजली जात होती. त्यांच्या भक्ती आणि उपासनेने प्रसन्न होऊन दुर्गा देवीने श्री रामाला लंकेच्या विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर भगवान रामाने दहाव्या दिवशी रावणाचा वध केला. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीनंतर विजयादशमी हा सण साजरा केला जातो.

नवरात्रीत, नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. ह्यावर्षी खालीलप्रमाणे रंगाची क्रमवारी ठरलेली आहे.
१५ ऑक्टोबर रविवार- नारंगी रंग
१६ ऑक्टोबर सोमवार- पांढरा रंग
१७ ऑक्टोबर मंगळवार- लाल रंग
१८ ऑक्टोबर बुधवार- गडद निळा रंग
१९ ऑक्टोबर गुरुवार- पिवळा रंग
२० ऑक्टोबर शुक्रवार- हिरवा रंग
२१ ऑक्टोबर शनिवार- राखाडी रंग
२२ ऑक्टोबर रविवार- जांभळा रंग
२३ ऑक्टोबर सोमवार- मोरपंखी रंग

नवरात्रीनंतर काही दिवसांतच आपल्याला वेध लागतात ते आपल्या सगळ्यात आवडीच्या सणाचे – म्हणजेच दिवाळीचे. दीपोत्सव हा भारतात सगळीकडे साजरा केला जातो. अर्थात दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात, घरात सुशोभित रांगोळी काढली जाते. आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते तसेच फटाकेही फोडले जातात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सणांत दागिन्यांची खरेदी केली जाते.
लोक वर्षभर आपल्या नोकरी आणि उद्योग-धंद्यामध्ये कष्टाने कमाई करतात आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास रहावा यासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.

दिवाळीची सुरुवात कधीपासून?
दिवाळी हा सण दरवर्षी पाच दिवसांचा असतो. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे मुख्य दिवस साजरे केले जातात. यामध्ये वसुबारसपासून म्हणजेच ९ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुरुवात होणार आहे. १० तारखेला धनत्रयोदशी, १२ तारखेला लक्ष्मीपूजन, १४ तारखेला दिवाळी पाडवा आणि १५ तारखेला भाऊबीज आहे.

दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी लक्ष्मी पूजन असते, हा दिवस म्हणजे दिवाळी सणाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेला सर्वांचे आरोग्य आणि धनसंपदेसाठी प्रार्थना केली जाते.

धनत्रयोदशीही दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. धनत्रयोदशीला धनतेरस देखील म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करतात. पाच दिवसांच्या दिवाळीची या दिवशी सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीही असते.

धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात. यावेळी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणूनच हा दिवस सोने, चांदी आणि भांडी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.

यानिमित्ताने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. भारतात सोने-चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीचा दिवस नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. सराफी कट्टा या दिवशी गजबजून जातो.

निगडी येथील लोकांच्या मनातील ज्वेलरी ब्रँड म्हणजेच सत्यम ज्वेलर्स. नवरात्रीपासूनच ग्राहक सत्यम ज्वेलर्समध्ये खरेदी करण्यास गर्दी करतात.
सोने, चांदी, हिरे, मोती, टेम्पल ज्वेलरी, पारंपरिक आणि आधुनिक स्मार्ट ज्वेलरीच्या असंख्य विविधतेमुळे आणि अप्रतिम कारागिरीसाठी सत्यम ज्वेलर्स ग्राहकांच्या घराघरात-मनामनात पोहचला आहे. ग्राहकांना सोने खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी सत्यम ज्वेलर्स प्रत्येक दिवाळीला ग्राहकांसाठी खास खरेदीची पर्वणीच घेऊन येत असते.

ग्राहकांचा उत्सवाचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी सत्यम ज्वेलर्स सादर करीत आहेत एक धमाकेदार ऑफर – सोन्याच्या दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी चक्क मोफत ! (*नियम व अटी लागू)
ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सत्यम ज्वेलर्स आपणां सर्वांना आमंत्रित करीत आहेत. हि ऑफर सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांमध्ये उपलब्ध आहे.

गेली ४० वर्षे सत्यम ज्वेलर्सला आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सत्यम ज्वेलर्स आपल्या असंख्य ग्राहकांचे आभार आणि अभिनंदन करीत आहे !
लवकरच सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांना भेट द्या आणि आनंद घ्या ” सोन्याच्या दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी चक्क मोफत ” ऑफेरचा !

तसेच आम्हांस आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की, पिंपरी-चिंचवड मधील सगळ्यात भव्य चांदीचे दालन सत्यम ज्वेलर्स लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहे. तर वाट कशाची बघताय या, खरेदी करा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करा !

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments