Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकलाच प्रकरणात अटक असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना तात्पुरता जामीन...

लाच प्रकरणात अटक असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना तात्पुरता जामीन मंजूर

२३ ऑगस्ट २०२१,
लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेले पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना कौटुंबिक कारणासाठी तात्पुरता जामीन मिळाला आहे. दरम्यान उर्वरित चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना आज (सोमवारी) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केले. तर, इतर चार कर्मचा-यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षातर्फे ऍड. प्रताप परदेशी, ऍड. गोरक्षनाथ काळे, ऍड. किर्तिकुमार गुजर, ऍड. संजय दळवी, ऍड. विपुल दुशिंग आनि ऍड. अमर लांडगे यांनी काम पाहिले. या प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे. अर्जदार लांडगे यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. कौटुंबिक कारणासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ऍड परदेशी आणि ऍड. काळे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना एसीबीने बुधवारी महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले होते. समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना दोनवेळा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. लांडगे यांनी घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments