Friday, September 11, 2026
Homeअर्थविश्ववाय.सी.एम. रुग्णालयाच्या नवीन ११ मजली इमारतीस ‘वाय.सी.एम. विद्यासदन’ नाव देण्याच्या प्रस्तावास स्थायी...

वाय.सी.एम. रुग्णालयाच्या नवीन ११ मजली इमारतीस ‘वाय.सी.एम. विद्यासदन’ नाव देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी

– स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने निर्णय

– ६० विद्यार्थी क्षमतेचे नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा मार्ग सुकर

​पिंपरी-चिंचवड: यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय.सी.एम.) रुग्णालयाच्या आवारामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ११ मजली इमारतीस “वाय.सी.एम. विद्यासदन” असे नाव देण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अधिकृत मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने हा विषय मार्गी लागला असून, यामुळे वाय.सी.एम. मधील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या विस्ताराला अधिक गती मिळणार आहे.

​वाय.सी.एम. रुग्णालयात MD व MS अभ्यासक्रम घेणाऱ्या १४७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नवीन इमारतीच्या ८, ९ व १० व्या मजल्यावर करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यास व संशोधनासाठी इमारतीच्या ६ व्या व ७ व्या मजल्यावर स्वतंत्र ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासनादेशानुसार (दि. १६ जुलै २०२५) वाय.सी.एम. रुग्णालयात ६० विद्यार्थी क्षमतेचे बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, या महाविद्यालयाचे कामकाज १ सप्टेंबर २०२५ पासून नवीन ११ मजली इमारतीच्या ३, ४ व ६ व्या मजल्यावर यशस्वीपणे सुरू झाले आहे.

वाय.सी.एम. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करणे आणि शैक्षणिक कक्षा रुंदावणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. नवीन ११ मजली इमारतीत पदव्युत्तर विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था, ग्रंथालय आणि बीएससी नर्सिंग महाविद्यालय यशस्वीपणे सुरू झाले आहे. या संपूर्ण शैक्षणिक संकुलास योग्य अशी ‘वाय.सी.एम. विद्यासदन’ ही ओळख मिळवून देणारा हा प्रस्ताव असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि वैद्यकीय शिक्षणाला अधिक प्रोत्साहन मिळेल. – अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments