महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चास सुमारे ६ कोटी ७७ लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये १० प्रकारची ५७ खेळणी बसविण्यासाठी ८३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. १६ मध्ये किवळे, शिंदेवस्ती व गुरुद्वारा परिसरात खडीमुरुम व बीबीएम पध्दतीने रस्त्याचे चर, खड्डे भरण्यासाठी १७ लाख रुपये खर्च होतील. प्रभाग क्र. १८ मधील महापालिका इमारतींची देखभाल दुरुस्ती कामे करण्यासाठी २५ लाख रुपये, प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागातील गुरुद्वारा परिसरातील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १७ लाख रुपये, तर प्रभाग क्र. १६ रावेत भागातील खडीमुरुम आणि बीबीएम पध्दतीने रस्त्याचे चर तसेच खड्डे भरण्यासाठी १७ लाख ४५ हजार रुपये, प्रभाग क्र. १३ साईनाथनगर व प्रभागातील विविध ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविणे तसेच स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २८ लाख रुपये, प्रभाग क्र. ८ मधील जे ब्लॉक, एस ब्लॉक आणि इतर ठिकाणच्या रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी ५२ लाख रुपये खर्च होणार आहेत.
प्रभाग क्र. ६ मधील धावडेवस्ती परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी ५२ लाख रुपये तर प्रभाग क्र. १२ मधील रुपीनगर तळवडे नव्याने होणा-या डी.पी. आणि इतर रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करण्यासाठी २४ लाख रुपये या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.