Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वफायर फायटींग मोटारबाईकसह विविध विकास कामांसाठी १०१ कोटी ४० लाख रुपये खर्चास...

फायर फायटींग मोटारबाईकसह विविध विकास कामांसाठी १०१ कोटी ४० लाख रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता…

अग्निशमन विभागाच्या वापराकरीता तीन फायर फायटींग मोटारबाईक घेण्यात येणार आहेत. यासाठी ४० लाख ४४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे १०१ कोटी ४० लाख ३२ हजार रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलसाठी १५ कोटी ५६ लाख रुपये देण्यास देखील सभेने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

४० लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असणा-या फायर फायटींग मोटारबाईकचा वापर अरुंद गल्ल्या, दाट वस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी होणार आहे. ज्या भागात चार चाकी वाहने जाऊ शकत नाही तेथे या मोटारबाईकद्वारे जाता येणार आहे. या बाईकमध्ये २० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या असून ३० मीटर लांबी पर्यंतचा होजरील पाईप असेल. या पाईपला प्रेशर नोझल असल्यामुळे फायर फायटींग पंपाद्वारे ५० फुटापर्यंत पाणी फेकले जाणार आहे. तातडीच्या प्रसंगी मोठ्या अग्निशमन वाहनाला आगीच्या ठिकाणापर्यंत सहजतेने पोहोचता यावे याकरीता वाहतुक मार्गातून वाट काढण्यासाठी या फायर फायटींग मोटारबाईकचा उपयोग एस्कॉर्टींग वाहन म्हणून होऊ शकतो. शिवाय पेट्रोलींग साठी देखील ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.

महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा विभागातील ग्रॅव्हीटी अंतर्गत असलेल्या चिंचवड ग्रॅव्हीटी, थेरगाव ग्रॅव्हीटी व सांगवी ग्रॅव्हीटी या जलक्षेत्रासाठी परिचालन करणे व देखभाल दुरूस्ती करणे अशा महसुली स्वरूपाची विविध कामे ग्रॅव्हीटी भागात काढण्यात आलेली आहेत. याकरीता वाढीव निविदा ८ कोटी ९२ लाख रुपये आणि वाढ-घट ६ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २५ ताथवडे येथील लोंढेवस्ती क्र. १ ते २, खंबेटे कॉलनी, रघुनंदन मंगल कार्यालयामागील गल्ल्या, ताथवडे गावठाण आणि प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी ९४ लाख २४ लाख रुपये, प्रभाग क्र.२३ मधील भगवती पाल्म्स ते विजय ट्रेडर्स पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ९९ लाख ८५ हजार रुपये, प्रभाग क्र.२५ वाकड येथील स्वामी विवेकानंदनगर क्र. १ ते ५ आणि शुभम, यशदा व ज्ञानदा कॉलनी, प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे तसेच प्रभाग क्र.२५ वाकड येथील सद्गुरु कॉलनी क्र. १ ते ३, सुदर्शननगर कॉलनी क्र. १ ते ६, प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्याकामी १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार आहेत. तर प्रभाग क्र. १२ मांगीरबाबा मंदीर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५१ लाख ३४ हजार रुपये खर्च केले जाणार असून या खर्चासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments