Tuesday, February 18, 2025
Homeगुन्हेगारीएसटी बस ब्रेक न लागल्याने शिवशाहीवर धडकली, दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी...

एसटी बस ब्रेक न लागल्याने शिवशाहीवर धडकली, दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार.. पिंपरीतील घटना

पिंपरीतील वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बससमोर तिचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनिक विभागातील सहाय्यक शिल्पा कैलास गेडाम (वय ३८ वर्ष) यांचा दोन्ही बसच्यामध्ये चिरडून दुःखद अंत झाला.

पिंपरीतील वल्लभ नगर बस आगारातील एसटी बाहेर काढताना बसचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे ती समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन धडकली. त्यावेळी एसटी विभागतील महिला कर्मचारी त्या बसचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या होत्या. या दोन्ही बसच्या मधोमध सापडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

शिल्पा कैलास गेडाम (वय ३८) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वल्लभनगर बस आगारामध्ये परतूर आगाराची बस पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी चालक बऱ्याच वेळापासून प्रयत्न करत होता. मात्र समोर बस असल्याने त्याला गाडी काढता येत नव्हती. मात्र त्यावेळी परतूर आगाराच्या बसचा वाहक अहमदपूर आगाराच्या बस चालकाच्या सीटवर बसला आणि बस सुरू करून त्याने बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या बसचा ब्रेक न लागल्याने ती बस समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन जोरात आदळली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments