नगरसेवक शाम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त कासारवाडी येथे शाम लांडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर आणि आरोग्य चिकित्सा शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजी महाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक शाम लांडे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, डॉ. महेश थिटे, उद्योजक नविन लायगुडे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेळके, रमेश बापू लांडगे, शरद आवटे, राष्ट्रवादी पदवीधर विभाग प्रदेश सरचिटणीस शिल्पा बिडकर, सयाजी लांडे, ॲड. संजय गोडसे, कार्तिक स्वामी आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात 51 बाटल्यांचे संकलन झाले ते इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटलला देण्यात आले. डॉ. डीवाय पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने 238 नागरिकांची तपासणी केली. यामध्ये डायबेटीस, बी. पी., हाडातील ठिसुळपणा, त्वचा रोग, नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरास महिला भगिनींचा लक्षणिय सहभाग होता. या शिबारीच्या आयोजनात शाम लांडे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अमित लांडे, संजय कुंदर, संग्राम घाटविसावे, प्रितम लांडे, तुषार लांडे, गिरीश नायर, आशिष लांडे, गणेश मातेरे आदींनी सहभाग घेतला.