आकुर्डी येथील ऐश्वर्यम कम्फर्ट कॉ.हौं.सोसायटीमध्ये पिंपरी-चिंचवड ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 53 नागरिकांनी रक्तदान असून या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक श्री. शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सोसायटीचे अध्यक्ष अमोल गणपत गोरखे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासत सोसायटीमधील सभासदांचा विविध उपक्रमात सहभाग असतो. त्यानुसार 53 जणांनी रक्तदान केले आहे. यापुढील काळातही सोसायटीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे गोरखे यांनी सांगितले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी निलेश जाधव, शेबी पॉल, श्रध्दा जाधव, सुप्रिया मोघे, अमित बाबर, निलेश डोईजोडे, कल्याण कळपे, पंकज ताले, अंकुर पाडेकर, मोहन भांगे, प्रिती जाधव यांनी परिश्रम घेतले.सोसायटीचे अध्यक्ष अमोल गणपत गोरखे यांनी आभार मानले.