पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १७ मधील महिलांसाठी विशेष उपक्रम राबवत सौ. मनीषा राजेश आरसुळ यांच्या माध्यमातून मोफतअक्कलकोट दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२5 रोजी होणार असून महिलांना सुरक्षित, सोयीस्कर आणि धार्मिक वातावरणात विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या यात्रेच्या नाव नोंदणीसाठी शिवनगरी , वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, गिरिराज सोसायटी याभागातून महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरातील महिलांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या देवदर्शनासाठी महिलांची मोठी नोंदणी हा उपक्रम लोकांच्या मनापर्यंत पोहोचल्याचा प्रत्यय आहे.
महिलांसाठी खास आयोजन म्हणून प्रवास, भोजन आणि आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात येत असून या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यात्रेची नोंदणी ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२5 दरम्यान करण्यात येणार आहे.
या यात्रेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता महिलांमध्ये धार्मिक पर्यटनाची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. समाजातील महिलांच्या सहभागासाठी असा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नावनोदंणीच्या अधिक माहितीसाठी महिलांनी पुढील नंबर संपर्क करावा 9145436367 / 9011949407 / 8805575170 / 9322575170 असे आवाहन राजेश आरसुळ मित्र परिवार कडून करण्यात आले आहे.


