मुंबई उच्च न्यायालयाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिके विरुद्ध स्पर्श हॉस्पिटलच्या रिकव्हरी बिला बद्दल स्वतंत्र याचिका दाखल करण्याच्या अटी वर स्पर्श हॉस्पिटल संस्थेस कोरोना काळातील थकीत बिले सहा आठवड्याच्या मुदतीमध्ये अदा करण्याचे पालिकेला आदेश
सदरील आदेश कोरोना काळात स्पर्श हॉस्पिटल या संस्थेला महापालिकेद्वारे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर चालविण्याबद्दल त्यांनी दाखल केलेल्या थकीत बिलासंदर्भात हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. स्पर्श हॉस्पिटल या संस्थेने महानगरपालिकेने ऑटो क्लस्टर हे चालविण्याबद्दल निविदा मागितल्या होत्या त्या निवेद्यमध्ये स्पर्श हॉस्पिटल ही संस्था लघुत्तम दरामध्ये प्रथम क्रमांक आली होती त्या अनुषंगाने महापालिकेतर्फे त्यांना लघुत्तम दरामध्ये ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर येथे काम करण्याचे आदेश प्राप्त झाले सदरील ऑटो क्लस्टर कोविड हेअर सेंटर स्पर्श संस्थेने दहा महिने कालावधी पर्यंत अत्यंत कटिबद्ध सचोटी प्रामाणिकपणाने चालविले परंतु त्याच स्पर्श हॉस्पिटलचे उर्वरित थकीत बिले महानगरपालिकेने राखून ठेवली होती त्या सर्व संदर्भात स्पर्श संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाकडे महानगरपालिका विरुद्ध याचिका दाखल करत धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला यासंदर्भात खुलासा मागविला असता महानगरपालिकेतर्फे दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी आयुक्तांमार्फत पत्राद्वारे असा खुलासा देण्यात आला की स्पर्श हॉस्पिटल या संस्थेला हिरा लॉन्स व राम स्मृती लॉन्स येथे असलेल्या स्पर्श संस्थेद्वारा कार्यान्वित असलेल्या कोविड केअर सेंटर यासाठी तीन करोड 29 लाख 544 एवढी विले अदा करण्यात आली होती परंतु सदरील कोविड केअर सेंटर संदर्भात तथाकथित घोटाळ्यांच्या आरोप बिले अदाएगी संदर्भात करण्यात आले या तथाकथित अपहाराबद्दल माननीय आयुक्त यांनी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते सदर समितीच्या अहवालामध्ये महानगरपालिकेच्या कार्यकालिन पद्धतीबद्दल ताशेरे ओढण्यात आलेली होते तसेच या बिल संदर्भात सुनील कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्पर्श संस्थे विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिके च्या सुनवाई मध्ये देखील स्पर्श हॉस्पिटल या संस्थे बद्दल कुठेही घोटाळ्याबद्दल ताशेरे ओढण्यात आलेले नव्हते तसेच पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या टिप्पणी बद्दल महापालिकेला जाब विचारण्यात आला होता तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधिकारी तसेच लेखापाल या सर्व पदाधिकाऱ्यांच्या टिप्पणी बद्दल सां श क ता दिसून येत असल्याकारणाने सर्व टिप्पणी यांना ओव्हर रोड करून तत्कालीन आयुक्तांच्या आदेशावरून सर्व गोष्टींबद्दल शहानिशा व वस्तू परिस्थिती लक्षात घेऊन चौकशी समिती नेमून त्यांच्या त्यांच्या शिफारशी द्वारे स्पर्श हॉस्पिटल व इतर संस्थांना कायद्याच्या चौकटीमध्ये बसून इतर संस्थेप्रमाणे स्पर्श हॉस्पिटल या संस्थेला बिले अदा करण्याचे आदेश देण्यात आले व त्या आदेशाप्रमाणे महापालिकेतर्फे स्पर्श संस्थेची हिरा व मोती या दोन्ही सेंटर ची बिले रीत सर अदा करण्यात आलेली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने स्पर्श संस्थे यांनी दाखल केलेल्या थकीत बिलांच्या संदर्भातील दाखल केलेल्या याचिकेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना खुलासा मागविला असता सद्य आयुक्त यांनी 2 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या पत्रांमध्ये वरील सर्व बाबींचा उल्लेख करत स्पर्श हॉस्पिटल या संस्थेकडे तीन करोड 29 लाख इतक्या रकमेची रिकवरी असल्याबाबतची शक्यता व्यक्त केली असून त्या रकमे शिवाय उर्वरित रक्कम देण्याचे मान्य केले
त्यावर मुंबई उच्च न्यायालय यांनी तथाकथित रिकवरी असलेल्या रकमे विरुद्ध स्पर्श संस्थेला महानगरपालिकेविरुद्ध स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे अटीवर उर्वरित रक्कम ही स्पर्श संस्थेत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेंना देण्यात आलेले आहेत.
सदरील मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाच्या विपर्यास करत काही मान्यवरांनी महापालिका आयुक्तांचा स्पर्श संस्थेला धक्का असे करून काही न्यूज चैनल व प्रसार माध्यमे यामध्ये अपप्रचार करण्यात आला असे दिसून येत आहे सदरील बातमीचे खरे सत्य हे या ठिकाणी आमच्याद्वारे करण्यात आले असून कुठल्याही सदर अपप्रचार करण्यात आलेल्या बातमीचे आम्ही खंडन करतो तसेच अशा प्रकारचे बदनामीकारक कृत्य करणाऱ्या काही मान्यवराविरुद्ध पुढील कार्यवाही करण्याचे आमचे मानस असून पुढील कारवाई आमच्याद्वारे करण्यात येईल