८ जुलै २०२१,
भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.१३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या, तर १२ जुलैपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावलं.
ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.
याच दरम्यान एकनाथ खडसे हे ८ जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं एनसीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केलं होतं. पण रात्री उशिरा संबंधित पत्रकार परिषद रद्द होत असल्याचा निरोप आला. ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना १२ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी देखील ईडीनं एकनाथ खडसेंना समन्स बजावला होता. मात्र कोरोनाची लागण झाल्याने उपस्थित राहण्यास अडचण असल्याचं सांगितलं होतं.
पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने १३ तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.