Saturday, November 2, 2024
Homeआरोग्यविषयककासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळतीमुळे काही जण बेशुद्ध…

कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळतीमुळे काही जण बेशुद्ध…

पिंपरी- चिंचवड शहरात मोठी दुर्घटना टळली, कासारवाडी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. पोहण्यासाठी २२ जण आले होते. पैकी, ११ जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.

पिंपरी- चिंचवड शहरातील कासारवाडीत मोठी दुर्घटना टळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात सकाळी क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. परिस्थिती अत्यंत भीषण होती. घटनास्थळी काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती देखील मिळत आहे.

परिसरात ५०० मीटर पर्यंत क्लोरीन गॅस पसरला होता. त्यामुळे जलतरण तलावाच्या समोरून जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचलेलं आहे. सकाळच्या बॅचला २० ते २२ जण पोहण्यासाठी आले होते. पैकी ११ जणांना त्रास झाल्याने त्यांना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे. या घटने प्रकरण महानगरपालिका कोणावर कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments