संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोध गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आज (दि.१०) पोलीस आयुक्तांलयावर धडक मोर्चा काढला होता.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संभाजी भिडे यांनी संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असू शकत नाही, जण गण मन हे आपले राष्ट्रगीत असू शकत नाही. १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस नाही. १५ ऑगस्टला काळा दिवस पाळून उपवास करावा असे बेताल वक्तव्य करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केलेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेवून महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरलेले आहेत. तसेच महात्मा फुले हा भडव्याच्या यादीतील समाज सुधारक आहेत.

संभाजी भिडे सातत्याने देश विघातक तसेच धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये समाजात अशांतता निर्माण होईल असे वारंवार वक्तव्य करत असून सत्ताधारी त्याला कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पाठीशी घालत आहेत. त्यामुळे देशप्रेमी नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा करण्यात या मागणीसाठी २८ जून २०२३ रोजी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. तसेच २९ जुलै २०२३ रोजी दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली होती. परंतु या दोन्ही तक्रारीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ तसेच संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी काही आंतरावरच थांबवले असून ठिय्या आंदोलन सुरू आहे.