Monday, October 7, 2024
Homeगुन्हेगारीपिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत २२६ गुन्हेगारांवर ‘मोक्का’

पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत २२६ गुन्हेगारांवर ‘मोक्का’

पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर जरब बसविण्याची मोहिम सुरूच ठेवली आहे. सोमवारी (ता. ३१) शहरातील आणखनी तीन टोळ्यातील १७ सराईत गुन्हेगारांवर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली आहे.

त्यामुळे कारवाई करण्यात आलेल्या टोळ्यांची संख्या २४ झाली असून २२६ गुन्हेगारांवर मोका कारवाई झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांची ‘पळता भुई थोडी’ अशी अवस्था झाली आहे.

शहर पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः कंबर कसली आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना रेकॉर्डवर घेऊन त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत सुमारे ८५ टोळ्या रेकॉर्डवर घेऊन त्यांना वेसन घातल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.

डोंगरे, परदेशी आणि मोतीरावे टोळी गजाआड
पिंपरी परिसरातील यशवंत डोंगरे टोळी, तळेगाव दाभाडे परिसरातील सुधीर परदेशी टोळी आणि भोसरी परिसरातील सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी परिसरातील टोळी प्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय २२), सुशांत उर्फ दगडी आणणा अनिल जाधव (वय १९), आकाश रंजन कदम (वय २१), शुभम कैलास हजारे (वय २५), सुशांत उर्फ भैया आजिनाथ लष्करे (वय २२), मयूर प्रकाश परब (वय २२), कृष्णा धोंडीराम शिंदे (२५, सर्व रा. पिंपरी), अजिंक्य अरुण टाकळकर (२१, रा. मोशी) या टोळीवर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

तळेगाव दाभाडे परिसरातील टोळी प्रमुख सुधीर अनिल परदेशी (वय २५, रा. केशवनगर, वडगाव मावळ), विवेक नंव पत्ता माहिती नाही) या टोळीवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोसरी परिसरातील टोळी प्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे (वय २०, रा. आळंदी), आकाश गोविंद शर्मा (वय२२, भोसरी),

राम सुनील पुजारी (वय २१, रा. मोशी), ओमकार मल्हारी दळवी (रा. दिघी) या टोळीवर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या तिन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवर पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीसांच्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतूक

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर, पद्माकर घनवट,

सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, भास्कर जाधव, जितेंद्र कदम आणि अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, ओंकार बंड, दत्ताजी कौमेकर, सागर शेंडगे, विनोद वीर, मच्छिंद्र बांबळे, संदीप जोशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीसांच्या या कारवाईचे शहरात सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

सन – मोका अंतर्गत कारवाई करण्यात आरोपी संख्या

२०१८ – ०७

२०१९ – ५९

२०२० – ५०

२०२१ – १८७

२०२२ – १२९

२०२३ (जुलै अखेर) – २२६

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments