Wednesday, February 21, 2024
Homeताजी बातमी.....हीच आमच्याकडून आपणाला गुरुदक्षिणा"…. एका सच्चा नेत्याने शरद पवार यांच्या साठी लिहिली...

…..हीच आमच्याकडून आपणाला गुरुदक्षिणा”…. एका सच्चा नेत्याने शरद पवार यांच्या साठी लिहिली एक खास पोस्ट

राज्यात झालेल्या सत्ता नाट्यानंतर खरंतर आता कोणाचाही राजकारणावर विश्वास राहिला नाही. अशात आज गुरुपौर्णिमा आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेकांचं भविष्य घडवलं आहे. त्या मुले त्यांच्या साठी एक खास पोस्ट त्यांचा सच्चा शिष्यानी लिहिली आहे . हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची फळी ही अजित पवार यांच्या सोबत गेली आहे. त्यात छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेत शरद पवारांची साथ सोडली आहे.

यामुळे शरद पवारांनी जे नेते घडवले अशांनीच साथ सोडल्यानंतर शरद पवारांची साथ नक्की देणार कोण असा प्रश्न राज्याला पडला असताना जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारख्या मोजक्या नेत्यानंतर पुण्यातील शरद पवारांची सावली समजल्या जाणाऱ्या माजी महापौर अंकुश काकडे यांनी देखील काहीही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नसल्याचं म्हंटल आहे.

आज गुरुपौर्णिमा असल्याने अंकुश काकडे यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट करत आपण शरद पवार यांच्या सोबतच असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. “आज गुरु पौर्णिमा ! आदरणीय पवार साहेब नमन… एकलव्याने आपल्या गुरूला गुरुदक्षिणा म्हणून डाव्या हाताचा अंगठा दिला. आम्ही तेवढे काही करू शकलो नाही, तरी साहेब आपल्या राजकीय प्रवासात आमची आपणास सतत साथ राहील, हीच आमचेकडून आपणाला गुरुदक्षिणा.” असं म्हणत अंकुश काकडे यांनी शरद पवार यांच्या सोबतच असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला होता. त्यानंतर या राजीनाम्याला सर्वात आधी विरोध करणारे हे अंकुश काकडे हेच होते. अंकुश काकडे हे ३ वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते १९८८ मध्ये ते पुण्याचे महापौर होते. त्यांनी म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद देखील भूषविलेले आहे. आता अंकुश काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. अंकुश काकडे हे शरद पवार यांच्या मर्जीतील नेते असून त्यांची ओळख सुरवातीपासूनच पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता अशीच आहे. त्यामुळे काकडे यांनी अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांची साथ दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments