Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयक'अनाथांची माय' "सिंधूताई सपकाळ" यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

‘अनाथांची माय’ “सिंधूताई सपकाळ” यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments