Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वशेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स, निफ्टीत तेजीसह सुरुवात…

शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स, निफ्टीत तेजीसह सुरुवात…

मंगळवारी झालेल्या व्यवहारात पडझड झाल्यानंतर आज बुधवारी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. एसजीएक्स निफ्टी निर्देशांक वधारला होता. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अमेरिकन शेअर बाजारही तेजीसह बंद झाला होता. आज सकाळी बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.

आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 291.42 अंकांच्या तेजीसह 61,993.71 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी49.85 अंकांच्या तेजीसह 18,435.15 अंकांवर खुला झाला. सेन्सेक्सने 62 हजार अंकांचा टप्पाही ओलांडला होता. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढू लागल्याने पुन्हा घसरण दिसू आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 67 अंकांनी वधारत 61,770.06 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 23.85 अंकांच्या तेजीसह 18,409.15 अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 कंपन्यांचे शेअर वधारले होते. तर, 13 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते. निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 35 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसत होते. तर 14 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.

निफ्टी निर्देशांकात एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.62 टक्क्यांची तेजी दिसत आहे. यूपीएलच्या शेअर दरात 1.21 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात 0.91 टक्के, एसबीआय लाइफच्या शेअर दरात 0.83 टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात 0.76 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, ब्रिटानियाच्या शेअर दरात 0.90 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. भारती एअरटेलमध्ये 0.62 टक्के, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 0.43 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 0.41 टक्के, टाटा कन्झुमरच्या शेअर दरात 0.31 टक्क्यांची घसरण दिसून आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments