Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.रविवारी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने होणाऱ्या महापूजेचे निमंत्रण पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.

‘हे माझे भाग्य’…
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला, असे ट्विट यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तर यंदाची आषाढी वारीत विठ्ठलाची महापूजा करणार, असे सकाळीच एकनाथ शिंदे म्हणाले होते. पंढरपुरात विठलाची पूजा करण्याचे भाग्य मला आणि कुटुंबाला मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments