गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यात वीज पडणे, झाडे पडणे अशा अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजूर महिला आणि पुरुष हे पावसाचे वातावरण पाहून कामावरून लवकर सुटले. कामवरून घरी जात असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे ते किवळे रस्त्यावर देहूरोड आणि कात्रज रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या होर्डिंगजवळ असणाऱ्या दुकानाच्या आडोशाला थांबल्या. पण, वारा एवढा जोरात आला की त्यांना काही समजायच्या आत डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच होर्डिंग खाली कोसळले. त्यात चार महिला आणि एका पुरुषाचा जागेवरच मृत्यू झाला.
मृतांमध्ये शोभा विजय टाक (वय ५०), वर्षा विलास केदारी (वय ५०), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९), भारती नितीन मंचक (वय २९), अनिता उमेश रॉय (वय ४५) अशी मृत झालेल्या महिला आणि पुरुषांची नावे आहेत. तर विशाल शिवशंकर यादव (वय २०), रहामद मोहमद अन्सारी (वय २१) आणि रिंकी दिलीप रॉय (वय ३९) अशी जखमींचा नावे आहेत.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुचाकीचालक भिजल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.यातील सर्व कामगार हे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. पावसाचे वातावरण झाले म्हणून ते कामावरून घरी लवकर निघाले. मात्र, रस्त्यातच त्यांना पावसाने गाठले. त्यामुळे ते आडोसा घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या होर्डिंगजवळ थांबले. तिथे पंक्चरच्या दुकानात ते थांबले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस येण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. त्यांना काही कळायच्या आत ते उभे असलले होर्डिंग त्यांच्या आंगावर पडले आणि ते त्यात त्यांचा नाहक बळी गेला. त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
रावेत भागातील मुकाई चौकात वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या पाठीमागे झाडपडीची घटना घडली असून दुचाकी देखील वादळी वाऱ्यामुळे पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी फ्लेक्स देखील फाटले असून मुकाई चौकात वाहतूक कोंडी झाली होती. काही मिनिटं पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले होते.