Sunday, June 15, 2025
Homeगुन्हेगारीधक्कादायक…! कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

धक्कादायक…! कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

३ जूलै २०२१.
कल्याणच्या कोळसेवाडी भागात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावानं बेदम मारहाण केली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली. संबंधित तरुणी रात्री रिक्षानं प्रवास करत होती. त्यावेळी रिक्षआचालकानं तिला छेडण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित तरुणीनं फोन करुन आपल्या मित्रांना बोलावलं. मात्र त्यावेळी रिक्षाचालक आणि गावकऱ्यांनी तरुणी आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण केली. परंतु, अद्याप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.

कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत असताना चालक तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. मात्र या ठिकाणी आल्यावर रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना बेदम मारहाण केली. अगदी पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच काय तर या तरुणीलाही बेदम मारहाण करण्यात आली. मात्र या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नसून मारहाण झालेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे तरुण अजून ही पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

दरम्यान, ही घटना ज्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली ते प्रत्यक्षदर्शी गुलाम मकबूल यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे. तर या तरुणांच्या मित्राने नेमके काय घडले, यासंदर्भात माध्यमांना सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments