३१ मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ३१ मार्च २०२१ रोजी २३९६ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २२८८ तर शहराबाहेरील १०८ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १४०१३८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२०३२२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २००३ जणांचा मृत्यू झालेला आहे.
चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ११ पुरुष भोसरी (७१ वर्षे), चिखली (८५ वर्षे), पिं. गुरव (६५, ४९ वर्षे), पिंपरी चिंचवड (६५ वर्षे), थेरगाव ( ४३ वर्षे), पिंपरी ( ४२, ४० वर्षे), यमुनानगर (६२ वर्षे), काळेवाडी (६५ वर्षे), निगडी (८८ वर्षे) ०४ स्त्री – चिंचवड ( ७२ वर्षे), दिघी ( ६१ वर्षे), रहाटणी (५५ वर्षे), निगडी (५५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष- खडकी (४७ वर्षे) राजगुरुनगर ( ५३ वर्षे), काळकुटी (३१ वर्षे) येथील रहिवासी आहे.
टिप :- आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ८ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | ३०५ | ५ | तालेरा | ४१० |
२ | भोसरी | ३७३ | ६ | थेरगाव | १६७ |
३ | जिजामाता | ३५९ | ७ | यमुनानगर | ३३० |
४ | सांगवी | २३९ | ८ | वायसीएम | १०५ |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | ३२६ | ५ | इ | २६७ |
२ | ब | ३४५ | ६ | फ | २४२ |
३ | क | ३०२ | ७ | ग | २५६ |
४ | ड | ३५५ | ८ | ह | १९५ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.