Thursday, February 6, 2025
Homeगुन्हेगारीधक्कादायक; मुलांनी बापाला भट्टीत जाळलं अन् राखेचं इंद्रायणीत विसर्जन केलं…

धक्कादायक; मुलांनी बापाला भट्टीत जाळलं अन् राखेचं इंद्रायणीत विसर्जन केलं…

दोन मुलांनी आपल्याच वडिलांचा खून केल्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह भट्टीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड जवळील म्हाळुंगे परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय बनसोडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर सुजित बनसोडे आणि अभिजित बनसोडे असं या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाळुंगे परिसरातील निघोजे गावचे रहिवासी असलेल्या धनंजय बनसोडे या व्यक्तीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद व्हायचे आणि त्याच वादातूनच मुलांनी वडील धनंजय यांची हत्या केली. आरोपींनी आधी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्य्यांनी आपल्याच फॅक्टरीमध्ये असलेल्या भट्टीत मृतदेह जाळला ,नंतर भट्टीतील राख त्यांनी इंद्रायणीत विसर्जित केली. आरोपींनी त्याजागी दुसरी राख आणून टाकली. त्यानंतर त्यांनी आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे धनंजय यांच्या प्रेयीसीचा पत्ता मिळवला. तिची चौकशी केली असता धनंजय यांचा त्यांच्याच मुलांनी घातपात केल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. वडिलांचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यावरून वडील आई आणि आपल्यासोबत सतत वाद घालायचे. त्यांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले होते, या रागातून आपन हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी आरोपींना उटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments