Monday, May 12, 2025
Homeगुन्हेगारीधक्कादायक! अंधश्रद्धेपायी चिमुकल्याच्या पोटावर गरम सळईचे चटके, बाळ गंभीर जखमी

धक्कादायक! अंधश्रद्धेपायी चिमुकल्याच्या पोटावर गरम सळईचे चटके, बाळ गंभीर जखमी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी भागात निरागस बालकावर वैद्यकीय उपचारांऐवजी बाबा-बुवा किंवा मांत्रिकांकडून अघोरी उपचार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकतंच एका 3 वर्षीय बाळाच्या पोटाला चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मांत्रिकाने डम्मा अर्थात पोटावर लोखंडी सळई गरम करुन चटके दिले. त्यामुळे या कोवळ्या बालकाच्या पोटावर जखमा झाल्या आहेत. 

चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा 3 वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. या बाळाचे आई-वडील परतवाडा परिसरात कामानिमित्त असतात. त्यांनी बाळाला धामणगाव येथील खाजगी डॉक्टराकडे औषधोपचार केले. मात्र बाळाची प्रकृती न सुधारल्याने त्यांनी बाळाला एका मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने पारंपारिक उपचार पद्धत अवलंबत, बाळाच्या पोटावर गरम सळईने चटके दिले. त्यामुळे साहजिकच बाळाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. या बाळाला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. तिथे या बाळाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

भुमका बाबाने कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डम्मा, डागण्या देवून पोटाची चाळणी केली. बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळतात, राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन बालकाच्या तब्बेतची विचारपूस केली. यशोमती ठाकूर यांनी बाळाच्या आई – वडिलांची भेट घेतली.

अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी मेळघाटात जनजागृती करण्यात येणार असून, भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments