Saturday, April 11, 2026
Homeगुन्हेगारीधक्कादायक ! पिंपरी-चिंचवड गोळीबाराने हादरलं — मित्रांनीच व्यावसायिकावर केला गोळीबार

धक्कादायक ! पिंपरी-चिंचवड गोळीबाराने हादरलं — मित्रांनीच व्यावसायिकावर केला गोळीबार

पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे. यात 37 वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुरम चौकाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नितीन शंकर गिलबिले यांच्यावर मित्रांकडून गोळीबार

समोर आलेल्या माहितीनुसार, अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर या ठिकाणी साडेपाच ते 6 वाडण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकुर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा आता मृत्यू झाला आहे.

हत्येमागे धक्कादायक कारण

मयत नितीन गिलबिले आणि अमित पठारे, विक्रांत ठाकूर हे तिघेही एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघे जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोळीबारानंतर अमित पठारे हे विक्रांत ठाकूर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध घेतला जात असून पोलीसांनी या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments