Thursday, May 23, 2024
Homeगुन्हेगारीधक्कादायक घटना : दोन मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेत केली आत्महत्या...

धक्कादायक घटना : दोन मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेत केली आत्महत्या…

दोन मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर आज सकाळी (मंगळवारी) या दोघांचे मृतदेह आढळले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दोन मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर आज सकाळी (मंगळवारी) या दोघांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाल देविदास दाभाडे (वय -20 वर्ष) आणि अनिल दादाराव आव्हाड (वय 35 वर्ष) अशी दोन्ही मृत तरुणांची नावं आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोघंही मित्र होते. दोघांनीही सोबतच धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांच्या आत्महत्येचं कारण मात्र समोर आलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दोघेही मजुरी करायचे. सकाळी स्थानिक कामगार कामावर निघालेले असताना रुळावर त्यांना छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडलेले आढळले. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या कुटुंबियांना संपर्क केला.

काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री बराच वेळ हे दोघंही एकमेकांसोबतच होते. मात्र, सकाळी त्यांचे मृतदेहच सापडले. या घटनेनंतर या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments