Tuesday, February 11, 2025
Homeताजी बातमीधक्कादायक -शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे यांचे ह्रदयविकाराने निधन

धक्कादायक -शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे यांचे ह्रदयविकाराने निधन

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे वय – ५२ यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे.

आज सकाळी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून पडले. चिंचवड येथील खाजगी रग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.चिंचवडगावात त्यांचा दांडगा संपर्क होता, गजानन चिंचवडे यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments