Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक - पुणे मेट्रोचे काम करताना ब्रिटिश कालीन हॅन्डग्रेनेड आढळला…

धक्कादायक – पुणे मेट्रोचे काम करताना ब्रिटिश कालीन हॅन्डग्रेनेड आढळला…

पुण्यातील बाणेर येथील आयसरल इन्स्टिट्यूट येथे मेट्रोचे काम सुरू असताना एक जून गंजलेले हॅन्डग्रेनेड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉम्ब दिसल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही बाब तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन येथे कळवण्यात अली होती.

त्यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक (BDS) आणि स्थानिक पोलीस दाखल झाले होते. पुढील कारवाई करण्यात आली आहे. आयसर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे मेट्रोचे काम सुरू होते. इन्स्टिट्यूटच्या मोकळ्या जागेत पाइप टाकण्याच्या कामादरम्यान चार फूट खड्डे खणले गेले होते. त्याच ठिकाणी तो बॉम्ब आढळून आला. ही बाब तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली असून घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. बॉम्बची पडताळणी केल्यानंतर तो जुना ब्रिटिश कालीन हॅन्डग्रेनेड बॉम्ब असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बॉम्ब जुना असल्याने त्याच ठिकाणी मोठा खड्डा करून बॉम्बला नष्ट करण्यात आले आहे. मात्र परिसरात मोठं भीतीचं वातावरण पसरले असून तूर्तास मेट्रोचे काम थांबण्यात आलं आहे. परिसराला पोलिसांचं छावणीचरूप आले आहे. यात मोठा अनर्थ टळला असे म्हणता येणार आहे. मात्र पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments