Thursday, May 15, 2025
Homeगुन्हेगारीधक्कादायक ; पुण्यात मोठा शैक्षणिक घोटाळा उघड, इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळांना १२...

धक्कादायक ; पुण्यात मोठा शैक्षणिक घोटाळा उघड, इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळांना १२ लाखांमध्ये वाटले बनावट प्रमाणपत्र

पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत, या शाळांना १२ लाखांमध्ये प्रमाणापत्र वाटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये तब्बल १२ शाळांची पुणे जिल्हा परिषदेमार्फत चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर,नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच जे शासनाचे प्रमाणपत्र आहे.ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.

या तिन्ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अजूनही जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.

सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्फत हे पत्र मिळत असते. हे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. शाळांचा इनवर्ड नंबर घेऊन त्याआधारे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या असून हे प्रमाण पत्र देण्यात आले आहे. या पत्रासाठी तब्बल १२ लाख रुपये घेण्यात आल्याचे पुढे आले आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला सीबीएसई शाळांच्या बनावट न हरकरत प्रमाणपत्र चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. तब्बल १० ते १३ शाळांनी हे बोगस प्रमाणपत्र घेतले असल्याचे पुढे आले असल्याचे चौकशी अधिकारी के. डी. भुजबळ यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments