Saturday, December 9, 2023
Homeगुन्हेगारीधक्कादायक ; एकतर्फी प्रेम प्रकरणातून पुणे शहरात तरुणीवर कोयत्याने हल्ला

धक्कादायक ; एकतर्फी प्रेम प्रकरणातून पुणे शहरात तरुणीवर कोयत्याने हल्ला

पुण्यात आज एम पी एस सी करणाऱ्या तरुणीवर एम पी एस सी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

काय आहे प्रकार…
पुणे शहरात एका तरुणाकडून एक युवक अन् युवतीवर हल्ला झाला आहे. सदाशिव पेठेत कोयत्याने हा हल्ला झाला आहे. अगदी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात ते युवक अन् युवती जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले आहे. तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. आरोपीच्या चौकशीनंतर सर्व प्रकरण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान पुणे शहरात नुकतीच दर्शना पवार हिची हत्या झाली होती. एमपीएससीची वनअधिकारी परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. परंतु लग्नास नकार दिल्यामुळे तिचा मित्र राहुल हंडोरे यांने राजगडावर नेऊन तिची हत्या केली. त्यानंतर राहुल फरार झाला होतो. आता पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. पुणे शहरात प्रेम प्रकरणातून होणाऱ्या या प्रकारांमुळे चिंता निर्माण झाली आहे.

सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकी जवळ घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments