Sunday, December 3, 2023
Homeआरोग्यविषयकधक्कादायक; मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या डॉक्टरला भरधाव कारची धडक… चिंचवड येथील घटना

धक्कादायक; मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या डॉक्टरला भरधाव कारची धडक… चिंचवड येथील घटना

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेलेल्या एका ४७ वर्षीय डॉक्टरला भरधाव कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कार चालकाचा शोध सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात एवढा भयानक होता की, कार चालकाने धडक दिल्यानंतर संबधित व्यक्ती तब्बल ५ फूट हवेत उडून खाली कोसळली. बळीराम बाबा गाढवे (वय ४७, रा. केशवनगर, चिंचवड) असं अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम गाढवे हे घरापासून पहाटेच्या वेळी पायी चालत काळेवाडी बीआरटी मार्गाजवळून जात होते. काही अंतर चालल्यावर त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगामध्ये एक कार आली. या वेगात आलेल्या कारने गाढवे यांना जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर गाढवे हे ५ फूट हवेत उडाले. त्यानंतर जोरात रस्त्यावर जाऊन आपटले. यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

गाढवे यांना उडविल्यानंतर जवळच असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दखल केलं. त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यात भरधाव कारने त्यांना उडविल्याचे पाहायला मिळत आहे. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments