२६ जानेवारी २०२०,
पुणे महानगरपालिका भवनाच्या निशिगंध हॉटेलमध्ये ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.या योजनेचा लाभ अधिकाधिक गोरगरीब आणि गरजू लोकांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
शिवभोजन योजना अंतर्गत दहा रुपयातील जेवणाची थाळी मिळणारी योजना आज २६ जानेवारी पासून पुणे, पिंपरीत सुरु झाली.पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा , कौटुंबिक न्यायालयातील कॅन्टीन, कात्रज कॉर्नर येथील ‘जेएसपीएम’ चे कॅन्टीन , स्वारगेट एसटी स्थानक, गुलटेकडी मार्केट यार्ड मधील हॉटेल समाधान , महात्मा फुले मंडई, हडपसर गाडीतळ येतील शिवसमर्थ भोजनालय येथे चालू झाले आहेत.
आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे कॅन्टीन येथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, सुलभाताई उबाळे , योगेश बहल, सचिन साठे इं मान्यवरांच्या उपस्थितीत शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला. पिपंरी चिचंवड मध्ये एकूण ४ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे कॅन्टीन, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे कॅन्टीन, वल्लभनगर एसटी स्थानक, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण येथील कॅन्टीन येथे उपलब्ध होणार आहे.
पुणे आणी पिंपरी चिचंवडमध्ये एकूण ११ ठिकाणी शिवभोजनाचा आनंद घेता येणार आहे. त्या मध्ये ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅमची भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरन मिळणार आहे.