Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीरायगडावरील पुरातत्व विभागाची तिकीट खिडकी शिवभक्तांनी हटवली

रायगडावरील पुरातत्व विभागाची तिकीट खिडकी शिवभक्तांनी हटवली

२ फेब्रुवारी २०२१,
रायगडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने तिकीट घर उभारलं होतं. पुरातत्व विभागाची तिकीट खिडकी शिवभक्तांनी हटवली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषदेखील करण्यात आला. कराच्या नावे जबरदस्ती पैशांची लूट केली जात असल्याचा शिवभक्तांचा आरोप आहे. यावेळी शिवसैनिक आणि महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

पुरातत्व विभागाकडून करवसुली करण्यात येत होती. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना २५ रुपये मोजावे लागत होते. मात्र कर भरुनही गडावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवभक्त संतापले. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. तिकीटघराची तोडफोड करत दरीत ढकलून तिकीटघराचा शिवभक्तांनी कडेलोट केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments