Friday, September 20, 2024
Homeताजी बातमी'खतरों के खिलाडी १३' च्या सेटवर शिव ठाकरेला झाली दुखापत …

‘खतरों के खिलाडी १३’ च्या सेटवर शिव ठाकरेला झाली दुखापत …

रोहित शेट्टीच्या या शो मध्ये शिव ठाकरे कठीणात कठीण स्टंट करत प्रेक्षकांचं मन जिंकतोय. पण आता त्याच्याविषयी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ‘खतरों के खिलाडी’ च्या सेटवर स्टंट करताना शिवला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठमोळा शिव ठाकरे सध्या हिंदीमध्ये चांगलाच नाव कमावत आहे. वेगवेगळ्या शो मधून शिव ठाकरे घराघरात पोहचला. ‘बिग बॉस 16’ फेम शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर शिव टीव्हीच्या लोकप्रिय स्टंट शो ‘खतरों के खिलाडी सीझन 13’ चा देखील एक भाग आहे. सध्या या शो मध्ये पण तो हिट होतोय. रोहित शेट्टीच्या या शो मध्ये तो कठीणात कठीण स्टंट करत प्रेक्षकांचं मन जिंकतोय. पण आता त्याच्याविषयी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ‘खतरों के खिलाडी’ च्या सेटवर स्टंट करताना शिवला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 13’चे शूटिंग जोरात सुरू आहे. टीव्ही, बॉलीवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी यावेळी स्पर्धक म्हणून शोमध्ये पोहोचले आहेत. या शोमध्ये प्रत्येकाला धोकादायक आणि तितकेच खतरनाक स्टंट्स करावे लागतात. यादरम्यान हे स्पर्धक स्टंट करताना जखमीही होत आहेत. आता याच यादीत शिवचं नाव देखील सामील झालं आहे. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस 16’ चा स्पर्धक शिव ठाकरे हाताला झालेली जखम दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या बोटांना टाके टाकल्याचे देखील दिसत आहे. शिव ठाकरेने बोटांचा क्लोजअप दाखवला आहे, जिथे अनेक टाके दिसतात. शिव ठाकरेने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात प्रत्येकजण त्यांना झालेली दुखापत दाखवत आहे. याआधी अर्चना गौतमही शोमध्ये जखमी झाली होती. तिच्या मानेला टाके पडले होते. आता शिवचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अनेक जण त्याला खतरों के खिलाडी 13 चा विजेता म्हणत त्याचं कौतुक करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments