Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीआगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ५० जागांचे ध्येय –शिवसेना खासदार संजय...

आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ५० जागांचे ध्येय –शिवसेना खासदार संजय राऊत

९ जुलै २०२१,
आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना किमान ५० जागांवर विजयी होईल. आणि महापौरही शिवसेनेचाच असेल. ५६ आमदार असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ५० नगरसेवकांच्या बळावर महापौर पदही सहज मिळेल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख पुणे जिल्हा बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार आढळराव पाटील, गजानन बाबर, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, विजय देशमुख, संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहूल कलाटे, सह संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड योगेश बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“चिंचवड भागात पाच किंवा सहा नगरसेवक असण ही चांगलं लक्षण नाही. लाज वाटली पाहिजी आपल्याला, अनेक वर्षे यासंदर्भात आपण विचार करतोय. १४ होते त्याचे नऊ झाले. नऊ चे ९० होतील हे मला माहित नाही. ५० तरी व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकारी आणि खासदारांकडे केली. पिंपरी-चिंचवडला शिवसेनेचा महापौर पाहिजे हे स्वप्न आपण पाहिलं पाहिजे. कोणीही ऐरागैरा महापौर होतोय,” अस देखील राऊत म्हणाले आहेत.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात इतर महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतींवर शिवसेनेची सत्ता येते. मात्र पिंपरी चिंचवडलाच का येत नाही. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ५० जागांचे ध्येय असून या ५० नगरसेवकांच्या बळावर महापालिकेचे महापौर पदी यावेळी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments