Friday, September 29, 2023
Homeअर्थविश्वमनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गुरुवारी ईडीच्या चौकशीला उपस्थितीत राहणार..?

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गुरुवारी ईडीच्या चौकशीला उपस्थितीत राहणार..?

१ डिसेंबर २०२०,
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अखेर अंमलबजावणी संचनालयानं ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार झाले आहे. गुरुवारी प्रताप सरनाईक आपला मुलगा विहंग यांच्यासह चौकशीला उपस्थितीत राहणार आहे.

ईडीने आज पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांचा मुलगा विहंग यालाही ईडीने चौथ्यांदा समन्स बजावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक हे होम क्वारंटाइन झाले होते. त्यामुळे आठवड्याभराची मुदत द्यावी, अशी मागणी ईडीकडे केली होती. त्यांच्या क्वारंटाइनची मुदत ही गुरुवारी संपत आहे. त्यामुळे सरनाईक यांनी चौकशीला हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मनी लाँड्रिंगच्या संशयावरून दिल्लीतून आलेल्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या घरासह 10 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशीही केली होती. त्यानंतर पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे विहंग सरनाईक हे रुग्णालयात होते. त्यामुळे तेही चौकशीला हजर नव्हते. पण, आता ते वडिलांसोबत येत्या गुरुवारी ईडीच्या चौकशीला हजर राहणार आहे. ईडी चौकशीत काही कारवाई केली तर ही मोठी घडामोड ठरणार आहे.

दरम्यान, ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांनी ईडी कोठडी अहवाल सादर केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे.

MRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

काय आरोप करण्यात आले?

1) MMRDA सुरक्षा रक्षक कंत्राटा मधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा हा 50 टक्के हिस्सा प्रताप सरनाईकांचा आहे. असं टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते

2) मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते ज्यातकरता महिला 32 ते 33 लाख रुपये MMRDA देणार होती हे कंत्राट 50-50 टक्के प्रॉफिट शेअरनुसार टॉप्स ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलं होतं. हा प्रताप सरनाईकांचा 50 टक्के शेअर टॉप्स ग्रुपकडून प्रताप सरनाईक यांच्या करता अमित चंडोळे रोख रक्कमेत स्विकारायचा.

3) अमित चंडोलेला टॉप्स ग्रुप दर महिना 6 लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंदनंतर अमित चंडोळेला दरमाह टॉप्स ग्रुपकडून 6 लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली.

4) उद्योगपती राहुल नंदा यांची आणि अमित चंडोळेची भेट प्रताप सरनाईक यांनी घडवून आणली होती.

5) MMRDA आणि टॉप्स ग्रुपमध्ये जे व्यवहार व्हायचे त्या व्यवहारातील 50 टक्के रक्कम ही राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलेल्या करारानुसार, अटी शर्ती पलिकडे जाऊन दिली जायची. ती ही रक्कम रोख स्वरुपात किंवा इंटरनेट बॅंकिंग स्वरुपात दिली जायची.

6) MMRDA चे सुरक्षा रक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी 50 टक्के नफा या टेंडरमधून प्रताप सरनाईकांना दिला जाईल असे सगळे व्यवहार तोंडी स्वरुपात एकमेकांशी झाली होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments