Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकमोशी कचरा डेपो दुर्घटनेवरील चर्चेत शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांना भाजपा नगरसेवकांकडून...

मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरील चर्चेत शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांना भाजपा नगरसेवकांकडून वारंवार अडथळा; सभागृहात गदारोळ

पिंपरी, दि. १५ : मोशी कचरा डेपो दुर्घटनेवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू असताना शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे यांना भाजपा नगरसेवकांकडून वारंवार अडविण्यात आल्याने सभागृहात काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.

दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा, जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, या मुद्द्यांवर सुलभा उबाळे सभागृहात आपली भूमिका मांडत होत्या. मात्र, त्यांच्या भाषणादरम्यान भाजपा नगरसेवकांकडून सातत्याने हस्तक्षेप करण्यात आल्याने त्यांना अनेकदा थांबावे लागले.

यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. सुलभा उबाळे यांनी, “मी तुमचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले आहे. आता माझेही म्हणणे पूर्ण ऐकून घ्या. महत्त्वाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाकारता येणार नाही. सभागृहात दादागिरीची भाषा चालणार नाही,” असे ठामपणे सांगत आपली भूमिका मांडली.

या घटनेमुळे काही काळ सभागृहातील कामकाजावर परिणाम झाला. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर पुढील कामकाज सुरू करण्यात आले.

मोशी कचरा डेपो दुर्घटना हा शहरासाठी अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय असून, या प्रकरणात पीडितांना न्याय, दोषींवर कारवाई आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर व्यापक चर्चा होणे अपेक्षित असताना सभागृहातील या वादाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments