Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वभामा-आसखेड कामासाठी ‘शॉर्ट टेंडर’ची मागणी, जुन्या ठेकेदाराला संधी नको; नगरसेविका सुलभा उबाळे...

भामा-आसखेड कामासाठी ‘शॉर्ट टेंडर’ची मागणी, जुन्या ठेकेदाराला संधी नको; नगरसेविका सुलभा उबाळे यांचे आयुक्तांना पत्र

भामा-आसखेड जलवाहिनीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ‘अल्प मुदतीची निविदा’ (शॉर्ट टेंडर) प्रक्रिया राबवून नवीन ठेकेदाराची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या जुन्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्याच्या हालचाली पालिकेत सुरू असून, त्यास उबाळे यांनी पत्राद्वारे तीव्र विरोध दर्शवला आहे.

काय आहे प्रकरण?

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भामा-आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या जलवाहिनीचे काम प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, तीन वेळा मुदतवाढ देऊनही संबंधित ठेकेदाराने केवळ ७० टक्केच काम पूर्ण केले. कामातील या दिरंगाईची गंभीर दखल घेत तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या ठेकेदाराला बडतर्फ केले होते.

सत्ताधाऱ्यांवर संशय

उर्वरित ३० टक्के काम करण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब होईल, असे कारण पुढे करून पुन्हा जुन्याच ठेकेदाराला संधी देण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. यावर संशय व्यक्त करत, अकार्यक्षम ठेकेदाराची पाठराखण कशासाठी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एका महिन्यात नेमणूक करा

उबाळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, “नव्याने निविदा काढण्यास विलंब होत असल्यास शॉर्ट टेंडर प्रक्रिया राबवून एका महिन्याच्या आत सक्षम ठेकेदाराची नेमणूक करावी. शहराला सध्या पवना व आंद्रा धरणातून पाणीपुरवठा होत असला, तरी वाढत्या लोकसंख्येसाठी भामा-आसखेड प्रकल्प वेळेत पूर्ण होणे ही काळाची गरज आहे.” आता प्रशासन लोकहिताचा विचार करून नवीन निविदा काढणार की जुन्याच ठेकेदारावर मेहेरबानी दाखवणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments