राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांना खातेवाटपाचे वेध लागले आहेत. त्यातच अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे आता शिवसेना शिंदे गट तसेच भाजपमधील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, असे बोलले जात आहे.
खातेवाटपाच्या या तिढ्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काल (ता.११) रात्री उशीरापर्यंत मुख्यंमंत्री यांचे निवासस्थान वर्षावर बैठक पार पडली. ही बैठक तब्बल तीन तास चालली असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही दाखल झाले होते. विशेष म्हणजे वर्षा बंगल्यावर फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार या बैठकीसाठी पोहचले. आणि बैठक संपण्याच्या एक तास अगोदरच ते आपल्या देवगिरी बंगल्यावर निघून आले.
या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या तीन तासाच्या बैठकीत कोणती खाती कुणाला? ?या संदर्भातही चर्चा झाली असल्याचे बोलेल जात आहे. बैठकीसाठी एका तास उशीरा पोहोचलेले अजित पवार हे फडणवीसांचा बैठक संपण्याआधीच आपल्या देवगिरी निवासस्थानी परतले.
अशातच एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वर्षावर झालेल्या बैठकीनंतर आता खातेवाटप अंतिम झाले आहे का? याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे कोणते खाते जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.