राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी इच्छा होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाची जनमाणसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा, माझे हितचिंतक, निस्वार्थी प्रेम करणारे कार्यकर्ते, अससंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमताने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं. देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं सांगतच ज्येष्ठ शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.
“देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.