Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीशांतीब्रम्ह मारुतीबाबा कु-हेकर यांना विश्व मैत्री संघाचा राष्ट्र गौरव पुरस्कार

शांतीब्रम्ह मारुतीबाबा कु-हेकर यांना विश्व मैत्री संघाचा राष्ट्र गौरव पुरस्कार

२४ जानेवारी २०२०
विश्व मैत्री संघाच्या राष्ट्र गौरव पुरस्काराचे रविवारी वितरण…..
26 जानेवारी प्रजासत्ताकदिनाच्या औचित्य साधून विश्व मैत्री संघाच्या वतीने ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2020’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 26 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता आर्चाय अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर पिंपरी येथे होणा-या या कार्यक्रमात आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक ह. भ. प शांतीब्रम्ह मारुतीबाबा कु-हेकर, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम.के. पाटील, अतिरीक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे, एनडीआरएफचे सेकंड इन कमांड सच्चिदानंद गावडे, हवाई दलाचे सेवा निवृत्त अधिकारी बिरेंद्र सिंग, उद्योजक प्रेमचंद मित्तल, वीर पत्नी विद्याताई सुभाष सानप, राष्ट्रीय खेळाडू प्रगती गायकवाड, दिव्यांग शिक्षक प्रविणकुमार गुप्ता, संस्कार प्रतिष्ठानचे उल्हास केंजळे यांना जेष्ठ माजी सैनिक पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व मैत्र संघाचे अध्यक्ष व विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

या कार्यक्रमात महापौर माई ढोरे, खासदार गिरीष बापट, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सुनिल शेळके, माजी आमदार संजय भेगडे, शरद ढमाले, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने, सुरेश म्हेत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवा नेते व शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भागवताचार्य दत्तात्रय महाराज, सामाजिक कार्यकर्ते अशोक साठे, शाम गुप्ता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आरती दिक्षित प्रस्तुत हम हिंदुस्थानी हा देशभक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दिपक चव्हाण, प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments