Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीनिवडणूक निकालापूर्वीच चिंचवडमध्ये झळकले शंकर जगताप यांच्या विजयाचे होर्डिंग 

निवडणूक निकालापूर्वीच चिंचवडमध्ये झळकले शंकर जगताप यांच्या विजयाचे होर्डिंग 

नुकत्याच पार पडलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन नगर येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी शंकर जगताप यांच्या विजया निमित्त अभिनंदनचा फलक लावला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात थेट लढत झाली आहे. काल (दि.२०) रोजी मतदान पार पडले, दरम्यान मतदान प्रक्रिया संपताच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी सुदर्शन नगर चौकात “नव्या पर्वाचं कणखर नेतृत्व.. शंकरभाऊ जगताप यांची चिंचवड विधानसभा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन” अशा आशयाचा फलक लावला आहे.

येत्या शनिवार (दि.२३) रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच नेमकं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. परंतु निकालापूर्वीच लावण्यात आलेल्या या फलकाची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments