Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमीचिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी… मागील निवडणुकीत राहुल कलाटेनी चांगली झुंज दिली...

चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी… मागील निवडणुकीत राहुल कलाटेनी चांगली झुंज दिली होती- संजय राऊत

पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या पिंपरी तसेच कसबापेठ या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या दोन्ही जागांवर आमदारांचे दुखद निधन झालेले आहे, त्यामुळे या निवडणुका घेतल्या जात आहेत. चिंचवडची पोटनिवडणूक आम्हीच लढावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. चिंचवड येथील मतदारांचाही तोच हट्ट आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे हे मातोश्रीवर आले होते. त्यावेळी या निवडणुकीविषयी चर्चा झाली. तेव्हादेखील कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने कसे लढावे हे आपण ठरवू. मात्र चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी, असे मत आम्ही मांडले,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी चांगली झुंज दिली होती. यावेळी ही जागा आम्ही जिंकू. महाविकास आघाडी आहे. चर्चेतून प्रश्न सुटतो. आम्ही देखील अनेक जागांवर दावा करतो. चिंचवडची जागा राष्ट्रवादीने लढवावी असे मत राष्ट्रवादीचे आहे. अजित पवार यांनी याबाबत मत मांडले होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असावी, असे आमचे मत आहे,” असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments