Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती...!

पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती…!

भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

शंकर जगताप यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. त्यांनी 2017 ची महापालिका निवडणूक तसेच 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचार आणि पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी चांगले काम केले आहे. माजी नगरसेवक शंकर जगताप हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. जमिनीवर राहून पक्ष कार्यकर्त्यांना ताकद देणे, पक्षाचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा गरजू नागरिकांना लाभ मिळवून देणे तसेच आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले मोठे सामाजिक कार्य उभे केलेले आहे.

या कामाची दखल घेऊन भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी शंकर जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

भाजपची राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष १५ मे आणि नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. ‘मोदी @9’ या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला होता. अखेरीस नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. शंकर जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते.परंतू, पक्षाने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने आता शंकर जगताप यांच्यावर शहराची जबाबदारी दिली आहे.
महापालिका निवडणुक, लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत महापालिकेत सत्ता कायम ठेवणे हे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments