Sunday, August 16, 2026
Homeउद्योगजगतभक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला गती; सुधारित डीपीआर सादर, ₹१२,९३७ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला गती; सुधारित डीपीआर सादर, ₹१२,९३७ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ४७.२१५ किमी लांबीच्या उन्नत मार्गावर ३४ मेट्रो स्थानके प्रस्तावित

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण औद्योगिक पट्ट्याला जोडणाऱ्या भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला अखेर गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सोमवारी लोकप्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला. सुमारे ₹१२ हजार ९३७ कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणार असून, या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे मानले जात आहे.

महामेट्रोने सादर केलेल्या सुधारित डीपीआरनुसार प्रस्तावित मेट्रो मार्ग ४७.२१५ किलोमीटर लांबीचापूर्णपणे उन्नत (Elevated)असून त्यावर ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गामुळे निगडी, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण हे निवासी, व्यावसायिक व औद्योगिक भाग थेट मेट्रोने जोडले जाणार आहेत.

फुगेवाडी येथील महामेट्रो कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत सुधारित डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित मार्गाचे संरेखन, स्थानके आणि पुढील प्रशासकीय प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, यूएमटीसीचे सल्लागार रजनीश पोडवळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, महामेट्रोने सुधारित डीपीआर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला होता. आता लोकप्रतिनिधींसमोर त्याचे सादरीकरण झाल्याने प्रकल्पाच्या मंजुरी प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य शासन, महामेट्रो आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पुढील टप्प्यात पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.

विधिमंडळातही उपस्थित केला होता प्रश्न

डिसेंबर २०२५ मध्ये विधिमंडळातील पुरवणी मागण्यांदरम्यान आमदार शंकर जगताप यांनी निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो मार्गाच्या प्रलंबित डीपीआरचा मुद्दा उपस्थित करत तातडीने मंजुरीची मागणी केली होती. तसेच नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी १९ जून २०२६ रोजी पत्राद्वारे सुधारित डीपीआरमध्ये सुचविलेल्या मागण्यांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती दिली होती.

प्रस्तावित ३४ स्थानके

भक्ती-शक्ती, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, आदर्श नगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशाल नगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, गवळी माथा चौक, सेंच्युरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर-१, गोडाऊन चौक, PIECC, भारत माता मोशी, चिंबळी फाटा, बारगे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण.

नागरिकांना होणारे फायदे

या मेट्रो मार्गामुळे निगडी ते चाकण प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. वाकड, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार व कर्मचाऱ्यांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांसाठी विश्वासार्ह व सुरक्षित प्रवासाची सुविधा निर्माण होणार आहे. खासगी वाहनांचा वापर, इंधन खर्च आणि प्रदूषण कमी होण्यासही या प्रकल्पाची मदत होणार असून मार्गालगतच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

आमदार शंकर जगताप म्हणाले…

भक्तीशक्तीवाकडनाशिक फाटा ते चाकण मेट्रो हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून पिंपरीचिंचवड आणि चाकण औद्योगिकपरिसराच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वाचा पाया आहेया प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्य शासनमहापालिकाआणि केंद्र शासनाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहेसुधारित डीपीआर सादर होणे हे महत्त्वाचे पाऊल असून लवकरातलवकर आवश्यक मंजुरी मिळवून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments