Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीशहिद भगतसिंग चौक व शेल पेट्रोलपंप गांगर्डे नगर – पिंपळे गुरव मतदार...

शहिद भगतसिंग चौक व शेल पेट्रोलपंप गांगर्डे नगर – पिंपळे गुरव मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील शहिद भगतसिंग चौक व शेल पेट्रोलपंप गांगर्डे नगर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी शेल पेट्रोलपंप कर्मचारी संतोष लोखंडे, रवी शर्मा, रमेश कांबळे तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री.राजाराम सरगर व स्वीप टिममधील इतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित असलेले मतदार नागरीक यांना निवडणूकीत मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये देशहितासाठी मतदान करा, “ वोट द्यायला जायचे आहे, आपले कर्तव्य बजावयाचे आहे ” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले तसेच त्यांच्याकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments