Monday, December 4, 2023
Homeगुन्हेगारीसेवा विकास बँकेचे संचालक अमर मूलचंदानी यांना 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी...

सेवा विकास बँकेचे संचालक अमर मूलचंदानी यांना 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक..!!

ईडीने सेवा विकास बॅंकेच्या 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिक आणि सेवा विकास बँकेचे (Seva Vikas Bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी (Amar Mulchandani) यांना अटक केली. ईडीने मूलचंदानी यांना न्यायालयात हजर केले असता मुंबतील विशेष न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. सेवा विकास बँक घोटाळ्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालयाकडे (Enforcement Directorate) आली होती. यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. (Amar Mulchandani arrested by ED in Seva Vikas Bank Fraud case)

ई़डीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांनी 2016 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते पिंपरीतील मिस्त्री पॅलेस या ठिकाणी राहतात. मूलचंदानी यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सुमारे 429 कोटी रुपयांचे आहे. मूलचंदानी यांनी आपल्या जवळच्या आणि मर्जीतील लोकांना बँकेचे कर्ज वाटप करून आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणी ईडीने 27 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा टाकला होता. या प्रकरणी त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ते जामिनावर बाहेर पडले होते.

मूलचंदानी यांनी केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात ऑगस्ट 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी सेवा विकास सहकारी बँकेत कर्जासाठी 124 बनावट प्रस्ताव तयार केले. त्यामाध्यमातून मर्जीतील विविध व्यक्ती आणि संस्थांना 429 कोटी रुपये वितरित करण्यात आले. त्यांनी कोणतीही कागदपत्रे न तपासता या बेकायदेशीरपणे कर्जांचं वाटप केलं होतं. त्या व्यक्तींची परतफेड करण्याची क्षमता नसतानाही कर्ज देण्यात आले. त्यामुळं बॅंक दिवाळखोरीत निघाली असून अनेक ठेवीदारांचे नुकसान झाले. याविरोधात मूलचंदानी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी 2020 मध्ये या बँकेचे ऑडिट केले होते. त्या ऑडीटमधून हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर मूलचंदानी, अशोक मूलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी आणि सागर मूलचंदानी या सहा जणांना अटक करण्यात आली. ईडीने मूलचंदानी, रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अरहाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 121 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments