Tuesday, February 27, 2024
Homeराजकारणसेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक , पहिल्यांदाच सेन्सेक्स ७० हजार पार …

सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक , पहिल्यांदाच सेन्सेक्स ७० हजार पार …

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भारतीय शेअर बाजाराने नव्या शिखरावर उसळी घेतली आहे. सोमवार, ११ डिसेंबर रोजी आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी सेन्सेक्सने प्रथमच ७०,००० अंकांचा टप्पा ओलांडला असून इतिहास रचला. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने ९.५५ मिनिटांनी ७०,०४८.९० अंकांची पातळी गाठली. दुसरीकडे, निफ्टीही २१,००० अंकांसह व्यवहार करत असून तज्ञांच्या मते, रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) MPC बैठकीत आर्थिक वाढ अंदाजे ७% पर्यंत वाढवली तर दुसरीकडे, महागाईच्या अंदाजात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सने जोरदार सुरुवात केली होती पण निफ्टी लाल रंगात घसरले. बँक निफ्टीने सुरुवातीला जवळपास ३०० अंक उडी घेतली. तसेच जागतिक पातळीवर अमेरिकन बाजारातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात डाऊ जोन्स आणि S&P 500 निर्देशांकांनी सर्वोच्च पातळी गाठली. तर आज, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा स्थिर आहेत आणि ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ७६ डॉलरच्या वर आहेत.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स १०० अंक किंवा ०.१४% वाढीसह ६९,९२५ अंकांवर तर NSE निफ्टी ४.१० अंकांच्या नाममात्र घरून २०,९६५ अंकांवर उघडला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments