Friday, September 29, 2023
Homeअर्थविश्वसेन्सेक्स ४७६१८ च्या रेकॉर्ड स्तरावर… भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी

सेन्सेक्स ४७६१८ च्या रेकॉर्ड स्तरावर… भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी

२९ डिसेंबर २०२०,
भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे. गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ सुरूच आहे. बँका, वित्त संस्था, ऑटो, एफएमसीजी या क्षेत्रातील शेअरला मागणी असून मेटल, टुरिझम या क्षेत्रात नफावसुली सुरु आहे.सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६४ अंकानी वाढला असून तो ४७६१८ अंकावर आहे. निफ्टी ५१ अंकांच्या तेजीसह १३९२५ अंकावर ट्रेड करत आहेत. वित्तीय सेवा क्षेत्रात सध्या सकारात्मक वातावरण आहे. तत्पूर्वी निफ्टीने पहिल्यांदाच १४००० अंकांचा टप्पा गाठला होता.

सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २७ शेअर तेजीने वधारले आहेत. तर तीन शेअरमध्ये घसरण झाली आहे. बँकांमध्ये इंडसइंड बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, बजाज फायनान्स या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर नेस्ले, एल अँड टी , एशियन पेन्ट या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

मेटलमधील नाल्को, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू , टाटा स्टील, जिंदाल स्टील या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बाजारात रोखीचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यामुळे निर्देशांक दररोज नवनवे शिखर सर करत आहेत. २०२० वर्ष सरायला आणखी दोन दिवस बाकी आहेत. त्याआधीच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात ६०००० कोटींची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य शेअर बाजार विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी दिली. ते म्हणाले की गेल्या सहा महिन्यात मिड कॅप शेअरनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. बँकांचे शेअर अजूनही त्यांच्या सार्वकालीन उच्चांकी स्तराच्या तुलनेत ५ टक्के खाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments