Tuesday, February 27, 2024
Homeअर्थविश्वशेअर बाजारात मोठी पडझड सेंसेक्स १३०० अंकांनी कोसळला, तर निफ्टी ४०२ अंकांनी...

शेअर बाजारात मोठी पडझड सेंसेक्स १३०० अंकांनी कोसळला, तर निफ्टी ४०२ अंकांनी कोसळला..

नुकत्याच उघडकीस आलेल्या २३ हजार कोटी रुपयांच्या एबीजी शिपयार्ड बँक घोटाळ्याचे पडसाद आज शेअर बाजारामध्ये स्पष्टपणे दिसून आले. आठवड्याच्या सुरुवातीला आज शेअर बाजारामध्ये व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स सुरुवातीलाच १५०० हून अधिक अंकांनी कोसळला. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता तो ११७२ अंकांनी खाली ५६९८० वर ट्रेड होत होता. तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली. निफ्टी ४०२ अंकांनी कोसळला होता. त्यानंतर तो ३५५ अंकांनी खाली १७ हजार १९ वर ट्रेड करत होता.

बँक, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये २.५० टक्क्यांपासून ३ टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून येत आहे. तर मेटल इंडेक्समध्ये ३.५० टक्क्यांनी घट झाली आहे. आज सेंसेक्सच्या टॉप ३० मध्ये केवळ टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये तेजीत आहे. बाकी २९ शेअरवर लाल निशाण दिसत आहे. एसबीआय, टाटा स्टील आणि एचडीएफसीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसत आहे.

भारतीय शेअर बाजारापूर्वी अन्य आशियाई बाजारामध्येही सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये घसरण दिसून आली. जपानमधील बाजारात दोन टक्क्यांनी तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही १.५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून येत होती. त्यापूर्वी शुक्रवारी अमेरिका आणि युरोपचे शेअर बाजारही घसरणीसह बंद झाले होते. त्याचा परिणाम स्टॉक मार्केटवर दिसून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments