७ जानेवारी २०२०,
आज मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाजार उघडताच ४०० अंकांनी उसळला. सध्या तो ५२७ अंकांनी वधारून ४१ हजार २०० अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही १५३ अंकांची कमाई करत १२१४५ अंकांचा स्तर गाठला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव काही प्रमाणात निवळल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खरेदीचा सपाटा लावला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये ७८७ अंकांची घसरण झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले होते.
अमेरिका आणि इराण दोन्ही देशांमधील तणाव काही प्रमाण निवळला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत अणुकरारावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. यांनतर आज आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारामंध्ये तेजी होती